केळीबागेचे आठवडी व्यवस्थापन

 केळी
केळीबागेचे व्यवस्थापन 

👉 मृग बागेतील केळफूल व शेवटची फणी कापून घडावर पोटॅशिअम डायहायड्रोजन फॉस्फेट ५ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम स्टिकरसह प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पुन्हा १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

👉घडाची गुणवत्ता राखण्यासाठी घड ६ टक्के सच्छिद्रता असलेल्या पॉलिथीन पिशव्यांनी झाकून घ्यावेत.

👉घडाच्या वाढत्या वजनामुळे केळी झाडाचे खोड वाकून मोडण्याची शक्यता असते. त्यासाठी झाडांना आधार देणे आवश्यक असते. आधार देण्यासाठी पॉलिप्रॉपीलीन पट्ट्यांच्या साह्याने किंवा बांबूचा वापर करावा.

👉बऱ्याच वेळा वादळी वाऱ्यांमुळे बागेतील झाडे मोडून उन्मळून पडण्याची शक्यता असते. त्यासाठी केळी बागेभोवती संजीव कुंपण म्हणून शेवरी लागवड फायदेशीर ठरते. शेवरी लागवड केली नसल्यास शेडनेटचा वापर करावा. परंतु कुंपणासाठी शेडनेट लावताना त्याची उंची बागेतील झाडांच्या उंचीपेक्षा थोडी जास्त असावी.

👉जून, ऑक्टोबर व फेब्रुवारी या सर्व लागवडीतील बागेत उसाचे पाचट, गव्हाचे काड किंवा हरभऱ्याचा भुस्सा वापरून आच्छादन करावे. तसेच झाडांवर केओलिन ८० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने फवारावे.

👉सध्या फेब्रुवारी लागवडीतील केळी रोपे स्थिरावून शाकीय वाढीच्या अवस्थेत आहेत. वाढत्या तापमानाचा केळी रोपांच्या वाढीवर परिणाम होऊ नये, यासाठी रोपाभोवती ताग लावून घ्यावे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post