केळी बाग खत, सिंचन व्यवस्थापन

 केळी
खत, सिंचन व्यवस्थापन 

केळी खत, सिंचन व्यवस्थापन

ऑक्टोबर लागवडीतील केळी बागेस युरिया ८२ ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात जमिनीतून मात्रा द्यावी. ठिबक सिंचनातून युरिया १३ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश ८.५ किलो प्रति १ हजार झाडे याप्रमाणे दर आठवड्याला द्यावे.

मृगबाग केळीसाठी युरिया ५.५ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश ७ किलो प्रति १ हजार झाडांना प्रति आठवडा याप्रमाणे ठिबक सिंचनातून द्यावे.

जून, जुलै लागवडीच्या बागेला १४ ते १६ लिटर पाणी, ऑक्टोबर लागवडीस ९ ते ११ लिटर, तर फेब्रुवारीमध्ये लागवड केलेल्या बागेस ४.५ ते ६.५ लिटर पाणी प्रति झाड प्रति दिन याप्रमाणे द्यावे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post