गहू पिक काढणी सल्ला

 गहू

गहू पिक काढणी

स्ट्रॉ रिपर/ स्ट्रॉ कंबाइन यंत्र गहू काढणीसाठी कंबाइन हार्वेस्टरचा वापर वाढलेला दिसून येत आहे. कंबाइन हार्वेस्टरच्या वापरामुळे गव्हाचा भुसा मिळत नाही, जो जनावरांसाठी एक उत्तम पर्यायी चारा म्हणून वापरला जातो. स्ट्रॉ कंबाइन हे ट्रॅक्टरच्या पाठीमागे जोडले जाते आणि पीटीओद्वारे पावर देऊन चालवले जाते. हे यंत्र गव्हाच्या कंबाइन हार्वेस्टिंगनंतर शेतात शिल्लक राहिलेल्या गव्हाच्या काडावर चालवले जाते. काडाची कापणी करणे, कापलेला आणि शेतातला काड गोळा करणे आणि तो मळणी ड्रममध्ये वाहून नेणे, त्याची मळणी करून भुसा बनवणे आणि तो भुसा ब्लोवरच्या साहाय्याने ट्रॉलीमध्ये वाहून नेणे, अशी पाच कामे एकत्रित केली जातात. या काडामध्ये कंबाइन हार्वेस्टरने सोडलेल्या गव्हाच्या ओंब्यादेखील येतात आणि त्याचीही मळणी होते. त्यासाठी यात एक चाळणी दिलेली आहे, ती चाळणी गव्हाचे दाणे वेगळे करते. या यंत्राला चालवण्याचा खर्च या गोळा केलेल्या गव्हातदेखील निघतो. स्ट्रॉ कंबाइन हे दोन प्रकारांत उपलब्ध आहेत. पहिल्या प्रकारात स्ट्रॉ कंबाइनच्या मागे भुसा साठवण्यासाठी मोठी ट्रॉली लावली जाते. दुसऱ्या प्रकारात त्या स्ट्रॉ कंबाइनच्या वरच छोटीशी डम्पिंग ट्रॉली फीट केलेली असते. पहिल्या प्रकारचे स्ट्रॉ कंबाइन मोठ्या आणि लांब पट्टा असलेल्या शेतीसाठी, तर दुसऱ्या प्रकारचे स्ट्रॉ कंबाइन लहान क्षेत्रासाठी उपयुक्त ठरते. या यंत्रामध्ये कटर बार, रील, ऑगर, काड वाहक, मळणी ड्रम, मळणी सिलिंडर, चाळणी, ट्रे, ब्लोवर आणि तयार झालेला भुसा फेकण्यासाठी पाईप इत्यादींचा समावेश असतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post