आंबा आठवडी सल्ला व जातीची माहिती

 आंबा 

आंब्याच्या विविध जातींना बाजारात त्यांच्या गुणधर्मामुळे मागणी असते. अवीट गोडीचा हापूस खाण्यासाठी, लोणच्यासाठी, रसासाठी व परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी फेब्रुवारी ते जून या कालावधीत उपलब्ध होतो. एप्रिल महिन्यापासून गोड केसर, रसाळ पायरी याच बरोबर तोतापुरी, नीलम, आम्रपाली, दशहरी हे आंबेदेखील उपलब्ध होणे सुरू होते. हापूसपासून विकसित संकरित रत्ना, सिंधू, सुवर्णा, सोनपरी या जातींना देखील बाजारात वाढती मागणी आहे.

आंबा अधिक काळ टिकवण्यासाठी तो वेळेवर काढणे आवश्यक आहे. वातावरणाचा आंब्याच्या पक्वतेवर परिणाम होताना आढळतो. कातळावरून परिवर्तित होऊन उष्णता वाढल्यामुळे समुद्रकिनारी आंबा ९० ते १०० दिवस तर अंतर्गत भागात १२५ ते १३५ दिवस तयार होण्यासाठी घेतो. आंब्याला मोहोर टप्प्याटप्प्यात आल्यास तीन ते चारवेळा काढणी करणे आवश्यक आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post