सुर्यफुल पिकातील कीड नियंत्रण

 सुर्यफुल

कीड नियंत्रण

⭕️ रसशोषक किडी (मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी) निंबोळी तेल किंवा करंज तेलाची २-४ टक्के प्रमाणे फवारणी केल्यास रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. पेरणीनंतर दर १५ ते २० दिवसांनी इमिडाक्‍लोप्रिड (२०० एसएल) ०.३ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (३६ ईसी) १.५ मि.लि. किंवा ॲसिफेट (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. शिफारशीप्रमाणे नत्राची मात्रा योग्य प्रमाणात द्यावी.
⭕️ पाने खाणारी किडी (तंबाखूवरील पाने खाणारी अळी, उंट अळी, केसाळ अळी) या किडींची अंडी असलेली जाळीदार पाने शोधून ती कीटकनाशक किंवा रॉकेलमिश्रित पाण्याच्या द्रावणात बुडवून किंवा जाळून/ पुरून नष्ट करावीत. प्रादुर्भाव वाढल्यास क्विनॉलफॉस २ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस २ मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. स्वच्छ मशागत केल्यास व बांधावरील तण काढल्यास या किडींचा प्रादुर्भाव कमी आढळतो.
⭕️ स्तबक पोखरणारी अळी क्रायसोपर्ला या परभक्षी किडीची अंडी किंवा अळी ८ ते ९ प्रति २० फुलांपाठीमागे सोडल्यास कीड नियंत्रण होते. फूलकळी अवस्थेमध्ये एचएनपीव्ही (५०० एलई) २ मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे संध्याकाळच्या वेळेस फवारणी करावी. दहा दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या केल्यास ही अळी रोगग्रस्त होऊन मरते किंवा बॅसिलस थुरीजेंसीस ४०० मि.लि. प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी. प्रादुर्भाव वाढल्यास क्‍लोरपायरीफॉस किंवा प्रोफेनोफॉस २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. कीटकनाशकांचा वापर गरजेनुसार करावा. परागीकरणाच्या कालावधीमध्ये यांचा वापर शक्‍यतो टाळावा. यामुळे मधमाश्‍यांची क्रियाशीलता टिकून राहील.

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post