हरभरा
फुलोरा अवस्थेनंतर नत्र स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते. म्हणून पीक फुलोऱ्यात असताना २ टक्के युरियाची (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम युरिया) पहिली फवारणी आणि त्यानंतर १० ते १५ दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी, यामुळे पीक उत्पादनात वाढ होते. हरभऱ्याला दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी कमी पडल्यास पिकावर पोटॅशिअम नायट्रेटची (१३-०-४५) १ टक्के (१० लिटर पाण्यात १०० ग्रॅम १३-०-४५) या प्रमाणे या प्रमाणे फवारणी करावी.