संत्रा-मोसंबी-लिंबू कीड व्यवस्थापन

संत्रा-मोसंबी-लिंबू

कीड व्यवस्थापन 


⭕️ फळांतील रस शोषणारा पतंग - प्रौढ पतंग सायंकाळी बाहेर पडून, पिकणाऱ्या आणि पिकलेल्या फळांच्या सालीत बारीक छिद्र पाडतात. या पतंगांना आकर्षित करून मारण्यासाठी, मॅलेथिऑन (५० ईसी) २० मि.लि. अधिक २०० ग्रॅम गूळ अधिक खाली पडलेल्या फळांचा रस ४०० ते ५०० मि.लि. प्रति २ लिटर पाणी या प्रमाणे विषारी आमिष तयार करावे. हे विषारी आमिष मोठ्या तोंडाच्या बाटलीमध्ये ठेऊन, झाडांवर अडकवून ठेवावे. गळालेली फळे एकत्र करून मातीत गाडून नष्ट करावीत. 

⭕️ कोळी - प्रादुर्भाव दिसताच, डायकोफॉल (१८.५ ईसी) १.५ मि.लि. किंवा सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास, दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी. 

⭕️फळमाशी - नर फळमाशीला आकर्षित करण्यासाठी, मिथाईल युजेनॉल १ मि.लि. अधिक मॅलेथिऑन (५० ईसी) ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण रुंद तोंडाच्या बाटलीत ठेऊन, बागेत ठेवावे. त्याकडे नर फळमाश्या आकर्षित होऊन बळी पडतात. फळ तोडणीच्या दोन महीने आधीच एकरी १० बाटल्या प्रति एकर बागेत ठेवाव्यात. यातील द्रावण दर सात दिवसांनी बदलावे.



Post a Comment (0)
Previous Post Next Post