केळी
खत व्यवस्थापन
🍌मग बागेस लागवडीनंतर १६५ दिवसांनी ८२ ग्रॅम युरिया व ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड द्यावे. लागवडीनंतर २१० दिवसांनी प्रति झाड ३६ ग्रॅम युरिया द्यावे.
🍌नविन कांदे बाग लागवडीस खताचा पहिला हप्ता (प्रति झाड ८२ ग्रॅम युरिया व ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) लागवडीनंतर ३० दिवसांच्या आत; तर दुसरा हप्ता (प्रति झाड ८२ ग्रॅम युरिया) लागवडीनंतर ७५ दिवसांनी द्यावा.
🍌ठिबक सिंचनातून खते द्यायची असल्यास, नविन कांदे बागेस दर हजार झाडांसाठी लागवडीपासून १ ते १६ आठवडे ४.५ किलो युरिया, ६.५ किलो १२-६१-० व ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश, तसेच मृग बागेस लागवडीपासून १७ ते २८ आठवडे १३ किलो युरिया व ८.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
🍌नवीन कांदे बागेस निंबोळी ढेप प्रति झाड २०० ग्रॅम, तर मृग बागेस प्रति झाड ५०० ग्रॅम मातीत मिसळून द्यावी. यामुळे पिकास अतिरिक्त अन्नद्रव्य उपलब्ध होतात. तसेच निंबोळी खत कुजताना उष्णता निर्माण होऊन जमिनीतील तापमान वाढून मुळांची कार्यक्षमता कायम राखण्यास मदत होते.