आंबा बाग व्यवस्थापन सल्ला

 आंबा 

पालवी अवस्थेतील आंब्यावर तुडतुड्यांच्या प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. किडीच्या प्रादुर्भावासाठी कोवळ्या पालवीचे निरीक्षण करावे. प्रादुर्भाव दिसून आल्यास, डेल्टामेथ्रीन (२.८ ईसी) ०.९ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाडावर तसेच खोडावर फवारणी करावी. बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असलेल्या आंब्यावर तुडतुडे व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मि.लि. अधिक हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) ०.५ मि.लि. किंवा विद्राव्य गंधक (८० डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारावे. पालवी आणि मोहोर अवस्थेतील आंबा बागेमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. आंब्याचा मोहोर करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे करपला असल्यास दुपारी कडक उन्हामध्ये झाडावरील मोहोर झाडून घ्यावा. नियंत्रणासाठी, ॲझॉक्सिस्ट्रोबीन (२३ एससी) ०.६ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post