केळी
मुख्य वाढीच्या अवस्थेतील मृगबागेस ठिबक सिंचन संचातून विद्राव्य खते द्यावीत. त्यासाठी प्रति हजार झाडांसाठी प्रति आठवडा ४.५ किलो युरिया, ६.५ किलो मोनो अमोनिअम फॉस्फेट (१२-६१-०) व ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ठिबक संचातून सोडावे. ठिबक सिंचन संच नसल्यास मुख्य वाढीच्या अवस्थेतील मृगबागेस जमिनीतून प्रति झाड ८२ ग्रॅम युरिया, ३७५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश बांगडी पद्धतीने किंवा झाडाच्या दोन्ही बाजूंनी कोली घेवून खत द्यावे. खत दिल्यानंतर लगेच मातीआड करावे.
निसवणीच्या/ घड पक्वतेच्या अवस्थेतील कांदेबागेस विद्राव्य खते देताना प्रति हजार झाडांसाठी प्रति आठवडा ५.५ किलो युरिया व ७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यातून सोडावे. ठिबक सिंचन संच नसल्यास निसवणीच्या व घड पक्वतेच्या अवस्थेतील कांदेबागेस प्रति झाड ३६ ग्रॅम युरिया अधिक ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश अशी खतमात्रा द्यावी.
केळी लागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यात, इडीटीए जस्त आणि इडीटीए लोह प्रत्येकी ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.