आले पिक सल्ला |आल्यासाठी अन्नद्रव्यांची मात्रा (कि.ग्रॅ./ आठवडा/ एकर)|

 आले 

जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा वापर केल्यास पिकाच्या गरजेनुसार खते देता येतात. माती परीक्षणानुसार विद्राव्य खतांचा वापर करावा. एखाद्या अन्नद्रव्यांची मात्रा कमी जास्त झाली, तर त्याचा परिणाम लगेच पिकाच्या वाढीवर दिसतो. उदा. आल्याला नत्र घटक जास्त झाल्यास शाकीय वाढ खूप जास्त होते आणि आले काडावरती जाते. फर्टिगेशन करताना प्रामुख्याने युरिया, फॉस्फरिक ॲसिड किंवा अमोनियम फॉस्फेट आणि पांढरा पोटॅशचा वापर करावा. आले पिकात फर्टिगेशनची सुरुवात लागवडीनंतर १५ दिवसांनी करावी. जमिनीद्वारे द्यावयाची खतांची मात्रा आणि फर्टिगेशनद्वारे द्यावयाची खतांची मात्रा वेगवेगळी आहे. 

💧 आल्यासाठी अन्नद्रव्यांची मात्रा (कि.ग्रॅ./ आठवडा/ एकर) 

पीकवाढीची अवस्था लागवडीपासूनचा कालावधी नत्र स्फुरद पालाश 

लागवड ते उगवण ३ ते ४ आठवडे (२ समान हप्ते) १.८ २.२५ १.१३ 

शाकीय वाढ ५ ते १४ आठवडे (१० समान हप्ते) १.८ ०.६८ ०.४५ 

कंदवाढीची सुरुवात १५ ते २६ आठवडे (१२ समान हप्ते) ०.७५ ०.५६ ०.५६ 

कंद तयार होण्याची अवस्था २७ ते ३२ आठवडे (६ समान हप्ते) ०.९ ०.७५ १.५

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post