तूर पिक आंतरमशागत व तणनियंत्रण

तूर

आंतरमशागत व तणनियंत्रण 

तूर पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली आणि ३०-३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते. त्यायोगे पीक वाढीस पोषक वातावरण तयार होते. बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळींतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी शक्यतो, वाफशावर करावी. तूर  पीक पहिले ३० ते ४५ दिवस तणविरहित ठेवावे. गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात. 

पावसामुळे किंवा मजुरांच्या कमतरतेमुळे खुरपणी/ कोळपणी करणे शक्य नसल्यास तणनाशकांचा वापर करावा. यामध्य पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी, पेंडीमिथॅलीन (३८.७ सीएस) ३ ते ३.५ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे सम प्रमाणात जमिनीवर फवारावे. अन्यथा पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी, इमीझाथापायर (१० एसएल) १.५-२ मि.लि. किंवा क्विझालोफॉप इथाईल (५ ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून तणांवर फवारणी करावी. उगवणीपश्चातची तणनाशके फवारताना जमिनीत ओलावा असण्याची गरज असते. तणनाशकाची फवारणी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल लाऊन करावी. (*तणनाशकांचा वापर करण्यापूर्वी पीक पद्धती, तणांचा तसेच जमिनीचा प्रकार व हवामानानुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post