केळी बाग आठवडी सल्ला

 केळी

केळीच्या नवीन मृगबागेत नांग्या पडल्यास नवीन रोपे/ मुनवे लावून नांग्या भराव्यात. लागवडीनंतर ३० दिवसांत द्यावयाची खतमात्रा प्रतिझाड ८२ ग्रॅम युरिया, २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते रिंग पद्धतीने द्यावी व मातीने झाकून घ्यावी. नवीन मृगबाग केळीला लागवडीनंतर ७५ दिवसांनी जमिनीतून द्यावयाची नत्राची मात्रा प्रति झाड ८२ ग्रॅम याप्रमाणे युरियामधून द्यावी. ठिबकद्वारे लागवडीपासून १ ते १६ आठवडे द्यावयाची खताची मात्रा दर हजारी ४.५ किलो युरिया, ६.५ किलो मोनो अमोनियम फॉस्फेट आणि ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा देण्याचा क्रम चालू ठेवावा. फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या केळी बागेला लागवडीनंतर १६५ दिवसांनी जमिनीतून प्रति झाड ८२ ग्रॅम युरिया आणि ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅशची मात्रा द्यावी. तर, ठिबकव्दारे लागवडीनंतर १७ ते २८ आठवडे द्यावयाची खताची मात्रा दर हजारी १३ किलो युरिया व ८.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश दर आठवड्याला देत राहावे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post