पूर्वहंगामी ऊस पीक संरक्षण

पूर्वहंगामी ऊस
पीक संरक्षण 

👉 हुमणीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करावी. रात्रीच्या वेळी कडुलिंब, बोर, बाभूळ या झाडांवर जमा होणारे हुमणीचे भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. हा उपक्रम सामुदायिकरीत्या दोन ते तीनवेळा राबवावा. 

👉 उसावर कांडी किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी प्रति एकरी दोन ते तीन ट्रायकोकार्ड्स मोठ्या बांधणीनंतर दर १५ दिवसांनी ऊस तोडणीपूर्वी एक महिन्यापर्यंत लावावीत. 

👉 पिकावर खवले किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी डायमिथोएट (३० ईसी) २.५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

👉 पांढऱ्या माशीच्या बंदोबस्तासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी ४०० ते ८०० ग्रॅम प्रति एकरी या प्रमाणात फवारणी करावी. 

👉 ऊस पिकास पायरिलाचा प्रादुर्भाव असल्यास इपरिकॅनिया मेल्यॅनोल्युका या परोपजिवी मित्र कीटकांचे २,००० जिवंत कोष किंवा २०,००० अंडीपुंज प्रति एकरी वापरावेत. 

👉 पोक्का बोईंग, तांबेरा, पानावरील ठिपके रोग नियंत्रणासाठी, कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा मॅंकोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post