कापूस
✨ वाणाची निवड
👉 कपाशीचा वाण निवडताना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व वाणाचे गुणधर्म यांचा विचार करावा.
👉 सर्व प्रकारच्या हवामानास व जमिनीस अनुकूल वाण असावे.
👉 आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा.
👉 वाऱ्यामुळे न पडणारे वाण असावे.
👉 रसशोषण करणाऱ्या किडी व रोगांना सहनशील/ प्रतिकारक्षम वाण असावा. शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते. त्यामुळे उशिरा लागणार्या बोंडांचा सुद्धा आकार मोठा राहतो व बोंडे फुटण्याचे प्रमाण वाढते.
👉 बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे.
👉 बोंडांचा आकार बागायती लागवडीसाठी मोठा व कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम असावा.
👉 पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा.
👉 बोंडे चांगली फुटणारा व धाग्याची प्रत चांगली असणारा वाण निवडावा, त्यामुळे कपाशीला चांगला बाजारभाव मिळू शकेल.
👉 वरील गुणधर्माप्रमाणे आपला मागील हंगामातील अनुभव तसेच आपण स्वतः इतर शेतकर्यांच्या शेतावरील पीक पाहून कपाशीच्या वाणाची निवड करावी.
अधिक उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असून त्यांचे त्या-त्या वाणाच्या गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल.