टोमॅटो
लवकर येणारा करपा (अर्ली ब्लाइट), पानांवरील ठिपके (सेप्टोरिया लीफ स्पॉट) या रोगांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा क्लोरथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तर उशीरा येणारा करपा (लेट ब्लाइट), फळसड (बक आय रॉट) रोगाच्या नियंत्रणासाठी, वरील बुरशीनाशकांव्यतिरिक्त मेटॅलॅक्झील एम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा फोसेटील एएल २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. झाडे योग्य प्रकारे बांधावीत. पाने आणि फळे मातीच्या संपर्कात येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. रोगग्रस्त झाडाचे अवशेष, रोगग्रस्त फळे गोळा करून जाळून टाकावीत.