वेल वर्गीय पिके
दोडका, कारले लागवडीसाठी चांगला निचरा होणाऱ्या, भुसभुशीत, मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. लागवडीपूर्वी शेताची चांगली मशागत करून एकरी ६ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. उन्हाळी लागवड जानेवारी ते मार्च महिन्यात करावी. लागवडीसाठी दोडक्याच्या पुसा नसदार, कोकण हरिता, फुले सुचिता; कारल्याच्या फुले प्रियांका, फुले ग्रीन गोल्ड, फुले उज्ज्वला, हिरकणी, कोकण तारा या सुधारित जातींची निवड करावी. तसेच बाजारामध्ये खाजगी कंपन्यांचे विविध उत्पादनक्षम वाण उपलब्ध आहेत. कारले आणि दोडका लागवडीसाठी ताटी पद्धतीचा अवलंब करावा. लागवडीचे अंतर १.५ x १ मीटर ठेवावे. लागवडीसाठी दोडका, कारले या पिकाचे सुधारित वाणांचे ८०० ग्रॅम ते १ किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेंडाझिम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. माती परीक्षण अहवालानुसारच रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.