कांदा-लसूण
कांदा बीजोत्पादनाचे उभे पीक
👉पुनर्लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी.
👉नत्र खताचा पहिला हप्ता १२ किलो प्रति एकर या प्रमाणात लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा.
👉नत्र खताचा दुसरा हप्ता १२ किलो प्रति एकर या प्रमाणात लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा.
👉 पिकास जमिनीचा मगदूर, तापमान यांचा विचार करून १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
👉 पीक संरक्षण
मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. यामुळे पानांवरील रोग आणि फुलकिडे यांचे नियंत्रण होईल.
पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने, हेक्झाकोनॅझोल १ मि.लि. अधिक कार्बोसल्फान १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावी.
वरील फवारणीनंतर सुद्धा पानांवरील रोग आणि फुलकिडे यांचे नियंत्रण झाले नाही, तर प्रोपीकोनॅझोल १ ग्रॅम अधिक फिप्रोनील १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
👉फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांच्या फवारण्या करू नयेत. कारण या फवारण्यांमुळे मधमाश्यांना हानी पोहोचते. त्याचा परागीकरणावर विपरीत परिणाम होतो.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.