गहू
खोडमाशीकरिता ढगाळ हवामान पोषक असते. खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन (१०,००० पीपीएम) २ ते ३ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (२५ ईसी) १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात गरजेनुसार एक ते दोन फवारण्या कराव्यात.
मावा व तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच, लेकॅनिसिलीयम लेकॅनी किंवा मेटाऱ्हायझीयम ॲनीसोप्ली या जैविक कीटकनाशकाची ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी. जैविक उपाययोजना करूनही कीड नियंत्रित होत नसल्यास, थायमेथोक्झाम (२५ डब्लूजी) ०.१ ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रिड (२० एसपी) ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात १० ते १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार एक ते दोन फवारण्या कराव्यात.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.