पूर्वहंगामी ऊस आठवडी सल्ला |

 पूर्वहंगामी ऊस


जीवाणू संवर्धकांचा वापर उसाच्या बेण्याला अॅसेटोबॅक्टर ४ किलो आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू अर्धा किलो प्रति एकरी ४० लिटर पाण्याच्या द्रावणात ३० मिनिटे बुडवून लागवड केली असता, ५० टक्के नत्र आणि २५ टक्के स्फुरद खताची बचत होऊन उत्पादनात वाढ होते. अॅसिटोबॅक्टर हे जीवाणू बेण्याच्या पेशीमध्ये प्रवेश करून नत्राची बचत करतात. स्फुरद विरघळविणारे जीवाणू जमिनीतील स्फुरद ऊस वाढीसाठी उपलब्ध करून देतात. ऊस लागवडीपूर्वी जीवाणू संवर्धकाची बेणे प्रक्रिया केली नसल्यास, लागवडीनंतर दोन महिन्यांनी ४०० मि.लि. द्रवरूप ॲसेटोबॅक्टर जीवाणू संवर्धक २०० लिटर पाण्यात मिसळून सकाळच्या वेळेस फवारणी करावी आणि प्रति एकरी अर्धा किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक ४० किलो कंपोस्ट खतामध्ये मिसळून सरीमधून द्यावे.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post