संत्रा-मोसंबी-लिंबू पिकातील तांबूस रंगाचे चट्टे व्यवस्थापन

 संत्रा-मोसंबी-लिंबू 

कीड व्यवस्थापन या महिन्यामध्ये मृग बहराच्या फळांवर कोळी कीडीचा प्रादुर्भाव दिसतो. कोळी प्रादुर्भावामुळे हिरव्या फळांवर तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. पुढे हळूहळू ते काळ्या रंगाचे होतात. स्थानिक भाषेमध्ये त्याला ‘लाल्या’ संबोधले जाते. कोळी नियंत्रणाकरिता, डायकोफॉल १.५ मि.लि. किंवा इथिऑन २ मि.लि. किंवा सल्फर (८० डब्ल्यूडीजी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी. लिंबूवरील पाने पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, क्विनालफॉस १.५ मि.लि. किंवा नोव्हॅल्युरॉन १ मि.लि. किंवा डायमिथोएट १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास वरीलपैकी कीटकनाशक बदलून पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post