शेळी पालन :-
गोठ्याची रचना ही A अक्षरासारखी असावी. शेळ्या-मेंढ्यांना फार खर्चिक गोठ्याची आवश्यकता नसते. गोठे थोड्या उंचावर बांधणे आवश्यक असते. गोठे कोरडे, हवेशीर आणि सोपे असावेत. हिवाळ्यात सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे गोठ्यामध्ये ओलावा जास्त वेळ टिकून राहतो आणि तापमान कमी होते. गोठ्याची दिशा ठरवताना पूर्व-पश्चिम बाजूने ठेवल्यास सकाळी आणि सायंकाळी कोवळ्या सूर्यकिरणांमुळे गोठ्यातील ओलसरपणा कमी होतो. उपलब्ध होणाऱ्या वैशिष्ठ्यपूर्ण सूर्यकिरणामुळे जंतुनाशक प्रक्रिया होऊन गोठे निर्जंतुक होण्यास मदत होते. गोठा कोरडा व स्वच्छ ठेवावा. गोठ्यातील जमिनीत चुनखडी किंवा मुरमाचा वापर केल्यास ओलसरपणा कमी होतो आणि जमिनीचे तापमान कमी होण्यास प्रतिबंध करता येतो. गोठ्यांच्या आजूबाजूला मोकळी जागा असावी. गोठ्याच्या दोन्ही बाजूंस जागा ठेवून कुंपण करावे. स्वच्छ पाण्याची सोय करावी. वयोमानाप्रमाणे शेळ्या, बोकड आणि लहान करडांची व्यवस्था करावी. शेळ्या-मेंढ्यांचे मुक्त संचार पद्धतीने संगोपन केले जात असेल, तर त्या ठिकाणी एका कोपऱ्यात एखादा बंदिस्त गोठा जरूर असावा. जेणेकरून रात्रीच्या वेळी शेळ्या-मेंढ्या तेथे जाऊन बसतील. त्यांचे थंडीपासून संरक्षण होईल. शेळ्या-मेंढ्यांना आणि लहान करडांना सकाळच्या वेळी कोवळ्या उन्हात मोकळे सोडावे, जेणेकरून त्यांना सूर्यप्रकाशातून उब मिळेल.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.