गहू
पेरणीनंतर २१ ते ३० दिवसांनी एक खुरपणी आणि कोळपणी करून तण नियंत्रण करावे. गव्हात चांदवेल, हरळी यांसारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता जरुरीप्रमाणे एक किंवा दोन खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. आंतरमशागतीमुळे तणांचा नाश होतो. जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. बागायती वेळेवर पेरलेल्या गव्हास खुरपणी झाल्यानंतर (सर्वसाधारणपणे २१-३० दिवसांनी) प्रति एकरी २४ किलो नत्र (५२ किलो युरिया), बागायती
उशिरा पेरलेल्या गव्हास प्रति एकरी १६ किलो नत्र (३५ किलो युरिया) द्यावा. पीक ५५ आणि ७० दिवसांचे असताना १९:१९:१९ या विद्राव्य खताची दोन टक्के (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम १९:१९:१९) या प्रमाणे दोनवेळा फवारणी करावी. दाणे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम युरिया) फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.