कांदा पिकातील रोग नियंत्रण

कांदा-लसूण

रोग नियंत्रण 

⭕️ काळा करपा 

🔬रोगकारक बुरशी: कोलीटोट्रिकम ग्लेओस्पोराइड्‌स 

सुरुवातीला पानाची बाह्य बाजू व बुडख्याजवळ राखाडी रंगाचे ठिपके आढळतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढून पाने वाळतात. कांद्यांची वाढ होत नाही. रोपवाटिकेतही रोपांची पाने काळी पडून वाळतात, रोपे मरतात. 

🛡️ व्यवस्थापन

👉रोपवाटिका गादीवाफ्यावर करावी. 

👉पनर्लागवडीवेळी रोपे कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणात बुडवून लागवड करावी. 

👉कांद्याची लागवड पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीतच करावी. 

👉शतात ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५०० ग्रॅम प्रतिएकर, २०० किलो शेणखतात मिसळून वापरावे. 

👉नियंत्रणासाठी, फवारणी (प्रतिलिटर पाणी) 

मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम 

⭕️ जांभळा करपा 

🔬रोगकारक बुरशी: अल्टरनेरिया पोराय 

पानावर सुरवातीस लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांच्या मधला भाग आधी जांभळा व नंतर काळा पडतो. असे अनेक चट्टे एकमेकांत मिसळून पाने करपतात. रोपांच्या माना मऊ पडतात. 

🛡️व्यवस्थापन

👉नत्रयुक्त खतांचा जास्त आणि उशिरा वापर करू नये. 

👉दरवेळी पिकांची फेरपालट करावी. 

👉नियंत्रणासाठी, फवारणी (प्रतिलिटर पाणी) 

मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनिल २ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. 

⭕️ तपकिरी करपा 

🔬रोगकारक बुरशी: स्टेमफिलीयम व्हेसिकॅरिय 

पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पानाच्या बाहेरील भागावर दिसून येतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. फुलांच्या दांड्यावर हा रोग आल्यास फुलांचे दांडे मऊ होऊन, वाकून मोडून पडतात. 

🛡️ व्यवस्थापन

👉नियंत्रणासाठी, फवारणी (प्रतिलिटर पाणी) 

मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल १ मि.लि.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post