डॉ. मैथिलीश सणस, डॉ. महेंद्र गवाणकर
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी
कोकणातील बदलत्या हवामानामुळे आंबा, काजू उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. हे लक्षात घेऊन चांगले आर्थिक उत्पन्न देणाऱ्या मुख्य फळ पिकांबरोबरच कोकम, जांभूळ, करवंद, फणस, पपई या पिकांची व्यापारीदृष्ट्या लागवड फायदेशीर ठरू शकते. या पिकांच्या लागवडीबाबत तसेच जातींच्या निर्मितीबाबत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये चांगले संशोधन झालेले आहे.
कोकम जाती कोकण अमृता
• फळे आकर्षक लाल, मध्यम आकाराची, जाड सालीची.
• उत्पादन १४० किलो प्रति झाड
• पावसापूर्वी तयार होत असल्याने फळांचे नुकसान टळते. कोकण हातीस
• फळे आकर्षक लाल, मोठ्या आकाराची, जाड सालीची.
• उत्पादन १५० किलो प्रति झाड व्यवस्थापन
• कोकमाचे झाड सरळ उंच जाणे अपेक्षित असते. परंतु बऱ्याचदा लागवडीनंतर त्याची वाढ वेली सारखी होते. हे टाळण्याकरिता लागवडीनंतर २ ते ३ वर्ष त्याला सरळ काठीचा आधार देवून वाढवावे लागते.
• पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला ऑगस्टमध्ये २ किलो शेणखत, १०० ग्रॅम युरिया, १५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, ५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
• फळांचे अधिक व लवकर उत्पादन मिळविण्यासाठी ३ टक्के पोटॅशिअम नायट्रेटच्या (१३:०:४५) दोन फवारण्या कराव्यात. पहिली फवारणी फळधारणेच्या वेळी व दुसरी फवारणी त्यानंतर २० दिवसांनी करावी.
• चांगल्या प्रतीची कोकम साल/ आमसूल तयार करण्यासाठी फळे पाण्याने धुवून, फोडून दोन भाग केल्यावर त्या साली सूर्यप्रकाशात चार दिवस वाळवाव्यात. ही वाळलेली साल कोकम आगळाच्या द्रावणात एक रात्र भिजवून रस निथळल्यानंतर सूर्यप्रकाशात नारळ झापांवर किंवा प्लॅस्टिक कागदावर दोन दिवस वाळवावी. आगळ द्रावणात साल भिजविण्याची आणि त्यानंतर वाळविण्याची प्रक्रिया करावी.