कोबी वर्गीय पिके रोग नियंत्रण

 कोबी वर्गीय पिके

रोग नियंत्रण 

⭕️ केवडा (डाऊनी मिल्ड्यू) 


रोगाचा प्रादुर्भाव बियाणे आणि जमिनीतून होतो. तसेच रोगग्रस्त झाडाचे अवशेष, पाणी व वाऱ्यामार्फत दुय्यम प्रसार होतो. रोगामुळे पानाच्या वरील भागावर पिवळसर रंगाचे तर खालील भागावर जांभळट, तपकिरी रंगाचे डाग दिसून येतात. सदर डागांवर नंतर भुरकट बुरशीची वाढ होते. प्रादुर्भाव रोपावस्थेत जास्त प्रमाणात होतो. पोषक वातावरणात संपूर्ण पाने करपून रोपे मरतात. पुनर्लागवडीनंतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पाने गळतात. त्यामुळे गड्डे चांगले पोसत नाहीत. गड्ड्यांची काढणी लांबल्यास त्यावर तपकिरी काळपट चट्टे पडतात आणि ते सडू लागतात. फुलकोबीचा मुख्य दांडा व आतील भाग काळा पडून सडतो. 

⚔️ उपाययोजना 

👉पीक स्वच्छ तणविरहित ठेवावे. 

👉मटॅलॅक्‍झिल + मँकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा क्‍लोरथॅलोनील २.५ ग्रॅम अधिक स्टीकर १ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. 

⭕️ भुरी 

पानाच्या वरील बाजूला पांढऱ्या रंगाची बुरशी दिसते. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पानावर करड्या पांढरट रंगाची बुरशी वाढलेली दिसते. पाने फिक्कट हिरवट, पिवळसर होऊन गळ होते, वाढ खुंटते. 

⚔️ उपाययोजना 

👉सल्फर (८० डब्ल्यूडीजी) २.५ ग्रॅम किंवा डिनोकॅप (४८ इसी) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post