भात
पीकपद्धती व नियोजन
🌾 खरीप भाताच्या कापणीनंतर जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर- खरीप भाताच्या लागवडीसाठी हळवे किंवा निमगरवे वाण वापरावे. कापणीपूर्वी रिले पद्धतीने रब्बी हंगामातील पिकांची (हरभरा, मसूर, कुळीथ, वाल, मोहरी, तीळ, जवस) टोकण करावी. यामुळे उपलब्ध ओलाव्यावर पीक उगवण चांगली होईल. कोणतीही मशागत न केल्यामुळे ओलावा अधिक काळ टिकून राहतो.
अथवा खरीप भाताच्या कापणीनंतर लगेच लाकडी/लोखंडी नांगराने हलकी मशागत करून जमीन हलवून घ्यावी. याचवेळी लगेचच ओळीत रब्बी हंगामातील पिकांची (जिरायती गहू, हरभरा, वाल, उडीद, राजमा, वाटाणा, जवस) पाभरीने पेरणी करावी.
🌾 उपलब्ध ओलावा आणि मर्यादित सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास- खरीप भाताच्या कापणीपूर्वी कोणतीही मशागत न करता, उपलब्ध ओलाव्यावर रब्बी पिकांची रिले पद्धतीने टोकण करावी किंवा हलकी नांगरट करून थोड्या मशागतीत रब्बी पिके पाभरीने पेरावीत. यामध्ये रब्बी पीक सुरवातीस उपलब्ध ओलाव्यावर चांगले येते. त्यानंतर वाढीच्या संवेदनशील अवस्थेत, फुलोऱ्यात किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाणी द्यावे. रब्बी पिकांमध्ये ज्वारी, हरभरा, सूर्यफूल, तीळ, मका, वाटाणा पिकांची निवड करावी.
🌾 सुविधा वर्षभर उपलब्ध असल्यास- अशा परिस्थितीत बहुविध पीकपद्धतीचा अवलंब करताना जमिनीचा कस सांभाळण्याकडेही लक्ष द्यावे. खरीप भाताच्या कापणीनंतर भाजीपाला लागवड ही लोकप्रिय पीकपद्धती आहे. यामध्ये साधारणपणे रब्बी व उन्हाळी हंगामातही योग्य नियोजन करावे लागते.
खरीप भात: रब्बी भाजीपाला: उन्हाळी मूग/भुईमूग/बाजरी
खरीप भात: रब्बी-उन्हाळी भाजीपाला
खरीप भात: उन्हाळी भात
खरीप भात: उन्हाळी भुईमूग/वैशाखी मूग
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.