हरभरा
आंतरपीक पद्धती
हरभरा पीक मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक म्हणून घेता येते. हरभऱ्याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. हरभऱ्याच्या सहा ओळी आणि रब्बी ज्वारीच्या दोन ओळी या प्रमाणे आंतरपीक फायदेशीर आहे. उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूंना किंवा वरंब्याच्या टोकावर १० सें.मी. अंतरावर हरभऱ्याची एक ओळ टोकण केल्यास हरभऱ्याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते. त्या बरोबरच हरभऱ्याचा बेवड उसाला उपयुक्त ठरून उसाच्या उत्पादनात वाढ होते. मात्र उसामध्ये हरभरा आंतरपीक घेताना पिकास योग्य प्रमाणात सिंचन द्यावे लागते. अन्यथा, उसाला मुबलक पाणी दिले असता हरभरा पीक जास्त पाण्यामुळे उभळून जाते.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.