कांदा आठवडी सल्ला | पिक संरक्षण |

 कांदा-लसूण

रांगड्या कांद्याचे उभे पीक
नत्राचा पहिला हप्ता १४ किलो प्रति एकर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा. पुनर्लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी. नत्र खताचा दुसरा हप्ता १४ किलो प्रति एकर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा. सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण (ग्रेड-२) ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी फवारणी करावी.
🛡️ पीक संरक्षण
👉काळा करपा नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) –
बेनोमिल २ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २ ग्रॅम
👉जांभळा व तपकिरी करपा नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) –
ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ मि.लि.
👉फलकीडे नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) –
कार्बोसल्फान २ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस १ मि.लि.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post