द्राक्ष जिवाणूजन्य करपा रोगाचे व्यवस्थापन

 द्राक्ष

जिवाणूजन्य करपा रोगाचे व्यवस्थापन 

बागेत ओलावा आणि उबदार वातावरण असल्यास रोगाची लक्षणे पानांवर दिसून येतात. या रोगामध्ये करपा रोगाच्या लक्षणांप्रमाणेच पानाच्या खालील बाजूस डाग दिसून येतात. कालांतराने हे डाग मोठे होऊन फुटीची वाढ खुंटते किंवा थांबते. जास्त प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी फुटीची वाढ कमी अधिक झालेली दिसून येईल.



 वेलींमध्ये जिवाणूंचा प्रवेश छाटणी, शेंडा मारणे, घडांची विरळणी तसेच गर्डलिंगच्या वेळी केलेल्या जखमेतून होतो. हे जिवाणू रोगग्रस्त वेलींच्या गाभ्यामध्ये जिवंत राहतात. गाभ्यातून वाहणाऱ्या अन्नरसाबरोबर ते नवीन, निरोगी फांद्या, फुटी व घडांमध्ये जातात. छाटणी व गर्डलिंगसाठी वापरलेल्या अवजारांमार्पत या रोगाचा प्रसार होतो. 

नियंत्रणासाठी, कासुगामायसीन (५%) + कॉपर ऑक्सिक्लोराइड (४५% डब्लूपी) ०.७५ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post