हळद
पर्णीय रोग नियंत्रण
⭕️ पानावरील ठिपके (लिफ स्पॉट)
पानांवर अंडाकृती, लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. पान सूर्याकडे धरून पाहिल्यास ठिपक्यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात. जास्त तीव्रतेमध्ये ठिपके एकत्र येऊन संपूर्ण पान करपते. पान तांबूस राखी-तपकिरी रंगाचे दिसते, वाळून गळून पडते.
⚔️ उपाययोजना
👉लागवडीसाठी रोगमुक्त बियाणे वापरावे.
👉रोगट पाने कापून घेऊन जाळून टाकावीत.
👉नियंत्रणासाठी, मॅन्कोझेब २ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
👉तीव्रता वाढल्यास, बोर्डो मिश्रण १ टक्का किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ ईसी) १ मि.लि. किंवा क्लोरथॅलोनील (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारावे.
⭕️ पानावरील ठिपके (लिफ ब्लॉच)
पानांवर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके पडतात. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते. पानाच्या खालील भागावर मुख्य शिरेच्या बाजूने लालसर करडया रंगाचे १-२ सें.मी. व्यासाचे ठिपके दिसतात. त्यामुळे पाने वाळतात. रोगाची सुरुवात जमिनीलगतच्या पानांवर होऊन नंतर रोग वरील पानांवर पसरतो. हळदीची पाने शेंड्याकडून पिवळी दिसायला लागतात. हे ठिपके फुलांवरसुद्धा आढळतात.
⚔️ उपाययोजना
👉लागवडीपूर्वी बेणे कार्बेन्डाझीम २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणात अर्धा तास बुडवून वापरावे.
👉रोगग्रस्त पाने वेचून नष्ट करावीत. शेतात स्वच्छता ठेवावी.
👉नियंत्रणासाठी, कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
👉तीव्रता वाढल्यास, बोर्डो मिश्रण १ टक्का किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ ईसी) १ मि.लि. किंवा क्लोरथॅलोनील (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.