रब्बी ज्वारीसाठी वाणांची निवड

 रब्बी ज्वारी

रब्बी ज्वारीच्या दर्जेदार उत्पादनासाठी संकरित व सुधारित जातींची निवड करावी. जमिनीच्या खोलीनुसार जातींची निवड केल्यास अधिक उत्पादन मिळते. ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात करावी. पाऊस आणि जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा अंदाज घेऊन पेरणीचे नियोजन करावे. कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे शिफारस केलेल्या सुधारित/संकरित जातींची जमिनीच्या प्रकारानुसार लागवड करावी. 

🔹 जमिनीच्या प्रकारानुसार जातींची निवड  

👉हलकी जमीन (खोली ३० सें.मी.) : फुले अनुराधा, फुले माऊली 

👉मध्यम जमीन (खोली ६० सें.मी.) : फुले सुचित्रा, फुले माऊली, परभणी मोती, मालदांडी ३५-१, 

👉भारी जमीन( ६० सें.मी.पेक्षा जास्त) : 

सुधारित वाण : फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.व्ही २२, पी.के.व्ही. क्रांती, परभणी मोती 

संकरित वाण : सी.एस.एच.१५, सी.एस.एच. १९ 

👉 बागायती : फुले रेवती, फुले वसुधा, सी.एस.व्ही.१८, सी.एस.एच.१५, सी.एस.एच. १९ 

👉 विशेष उपयोगासाठी 

हुरड्यासाठी : फुले उत्तरा, फुले मधुर 

लाह्यांसाठी : फुले पंचमी 

पापडासाठी : फुले रोहिणी

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post