कापूस
कपाशीच्या बोंडांची फुगवण व बोंडे पूर्णपणे उमलण्यासाठी, पोटॅशिअम नायट्रेट (१३-००-४५) या विद्राव्य खताची १ टक्का (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. कोरडवाहू कपाशीची पाने लाल पडत असल्यास, मॅग्नेशिअम सल्फेट ०.२ टक्के (२ ग्रॅम प्रति लिटर पाणी) अधिक डी.ए.पी. खत २ टक्के (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात ८ ते १० दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारणी करावी.
कापशीतील ‘लाल्या रोग’ व्यवस्थापण व सोयाबीन कापणीनंतर पिक सल्ला.
तूर
कीड नियंत्रण
- शेंगा पोखरणारी अळी - सुरवातीच्या काळात अळ्या कोवळी पाने, फुले किंवा शेंगा भरताना कोवळे दाणे खातात.
- ठिपक्यांची शेंगा पोखरणारी अळी - फुलोऱ्यापासून किडीचा प्रादुर्भाव दिसतो. कमी कालावधीत येणाऱ्या जाती व जास्त आर्द्रता असलेल्या भागात किडींचा प्रादुर्भाव दिसतो. अळ्या पाने, फुलकळ्या आणि शेंगा एकत्र करून त्यांचा गुच्छ करून लपून बसतात. त्यामुळे कोवळे शेंडे, पाने आणि शेंगा एकमेकांना चिकटून खोडाची व शेंगांची वाढ खुंटते.
- पिसारी पतंग - कळी, फुलोरा आणि शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या कळ्या, फुले आणि व शेंगांना छिद्रे पाडून आतील भाग खातात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या प्रथम शेंगांचा पृष्ठभाग खरवडून खातात व नंतर शेंगांच्या बाहेर राहून आतील दाणे खातात व शेंगांवर अथवा शेंगावरील छिद्रांमध्ये कोषावस्थेत जातात.
उपाययोजना - पहिली फवारणी - पिकास फुलकळी येताना, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणे करावी.
- दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (५०० एलई) १ मिलि किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे करावी.
- तिसरी फवारणी - दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इंडोक्झाकार्ब (१४.५ एससी) ०.७ मिलि किंवा इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणे करावी.
कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.