सोयाबीनची
सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी, पीक फुले लागण्याच्या अवस्थेत असताना सायकोसील (क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० एसएल) या संजीवकाच्या ५०० पी.पी.एम. द्रावणाची (१ मिलि प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी.
कृषी सल्ला- आले आणि हळद पिक सल्ला
तूर
तुरीच्या वाढीसाठी उत्तम निचरा आवश्यक असल्याने शेतातील पाणी सुरक्षितरीत्या बाहेर काढावे. जास्त पावसामुळे शेतातून पाणी जास्त वाहिले असल्यास पाण्याबरोबर नत्र वाहून जाण्याची शक्यता असते. तुरीची खालची पाने पिवळी पडली असल्यास नत्राची कमतरता लक्षात घेऊन २ टक्के युरियाची किंवा २ टक्के डी.ए.पी.ची (२ किलो प्रति १०० लिटर पाणी) फवारणी फायदेशीर ठरू शकते. फवारणी शक्य नसल्यास अशा शेतामध्ये निंबोळी पेंड एक पोते व युरिया अर्धा पोते प्रति एकरी कोळपणी देण्यापूर्वी वापरावे.