हळद
हळद पिकाला खतामधील सर्वच घटकांची कमी-अधिक प्रमाणात गरज असते. हळद पिकास एकरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश देण्याची शिफारस आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावयाचे असते. नत्र मात्र २ समान हप्त्यात विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावयाचा असतो. नत्राचा दुसरा हप्ता भरणीच्या वेळी (लागवडीनंतर १०५ दिवसांनी) द्यावा. लागवडीनंतर ४५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असल्यास, या वेळी एकरी ४० किलो नत्र (८७ किलो युरिया किंवा १९० किलो अमोनियम सल्फेट) आणि ५ किलो फेरस सल्फेट द्यावे.आले
आले पिकाला खतामधील सर्वच घटकांची कमी-अधिक प्रमाणात गरज असते. आले पिकास एकरी ४८ किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश देण्याची शिफारस आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावयाचे असते. नत्र मात्र २ समान हप्त्यात विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावयाचा असतो. नत्राचा दुसरा हप्ता भरणीच्या वेळी (लागवडीनंतर १०५ दिवसांनी) द्यावा. लागवडीनंतर ४५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असल्यास, या वेळी एकरी २४ किलो नत्र (५२ किलो युरिया किंवा ११४ किलो अमोनियम सल्फेट) आणि ५ किलो फेरस सल्फेट द्यावे.