कापूस
आंतरपिके - मागील काही वर्षांपासून पिकाची वाढ, फुले लागणे, बोंडे लागण्याच्या काळात पावसाचा खंड आदी बाबी अनुभवास येत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट येते. हवामानाचा धोका कमी करण्यासाठी कापसामध्ये आंतरपीक घेणे फायदेशीर आहे. याशिवाय आंतरपिकांमुळे मातीची धूप थांबते. पावसाचे पाणी जमिनीत जास्त मुरते. द्विदलवर्गीय आंतरपिकांमुळे नत्र स्थिरीकरण होते. त्यामुळे कापसात पुढीलप्रमाणे आंतरपिके घ्यावी : कापूस + मूग (१:१), रुंद ओळींत कापूस + मूग (१:२), कापूस + उडीद (१:१), कापूस + सोयाबीन (१:१), कापूस + तूर (४-६:१ किंवा ६-८:२)
पशुपालन:- ।बैलामधील खांदेसुज व उपाय।
मका
आंतरपिके - मक्याच्या दोन ओळींत अधिक अंतर असल्यामुळे आणि कमी पसारा असल्याने पिकाची सावली कमी पडते. त्यामुळे सूर्यप्रकाशाचा कार्यक्षमपणे वापर आणि दोन ओळींतील असलेल्या जागेत लवकर येणारी कडधान्ये (उडीद, मूग, चवळी), तेलबिया (भुईमूग, सोयाबीन) आणि भाजीपाला (मेथी, कोथिंबीर, पालक, कोबी इ.) ही आंतरपिके यशस्वीरीत्या घेता येऊ शकतात. मक्यात भुईमूग हे आंतरपीक जोडओळ किंवा सोडओळ पद्धतीने घेता येते. पेरभातामध्ये बहुतांशी शेतकरी मका हे मिश्र पीक मुख्यतः हिरवी कणसे आणि चारा यासाठी घेतात. पेरभात + मका आंतरपीक पद्धतीमुळे भात उत्पादनात लक्षणीय घट येते. तथापि, पेरभाताच्या सहा ओळींनंतर दोन रोपांत २५ सें.मी. अंतर ठेवून मका टोकण करणे हे इतर पेरभात + मका मिश्र पीक पद्धतीपेक्षा फायदेशीर आहे.