कृषि सल्ला-| हरभरा, रब्बी ज्वारी,भात|-krushik app

हरभरा🌱

सधारीत वाण वाण – कालावधी (दिवस) - उत्पादन (क्विं/हे) - वैशिष्टये विजय – जिरायत ८५ ते ९०, बागायत १०५ ते ११० - जिरायत १४, बागायत २३ - अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, अवर्षण प्रतिकारक्षम विशाल - १०० ते ११५ दिवस - जिरायत १३, बागायत २० - आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव दिग्विजय - जिरायत ९० ते ९५, बागायत १०५ ते ११० - जिरायत १४, बागायत २३ - पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य विराट - ११० ते ११५ - जिरायत ११, बागायत १९ - काबुली वाण, अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव कृपा - १०५ ते ११० - बागायत १८, जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण, दाणे सफेद पांढऱ्या रंगाचे, सर्वाधिक बाजारभाव फुले विक्रम - जिरायत ९५ ते १००, बागायत १०५ ते ११० - जिरायत १६, बागायत २२ - यांत्रिक पद्धतीने काढणीस उपयुक्त, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य पीकेव्हीके २ - ११० ते ११५ - बागायत १६-१८ - जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण पीकेव्हीके ४ - १०५ ते ११० - बागायत १२-१५ - जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण बीडीएनजी ७९७ - १०५ ते ११० - जिरायत १४-१५, बागायत: ३०-३२ - मध्यम दाणे, मराठवाडा विभागासाठी प्रसारित साकी ९५१६ - १०५ ते ११० - बागायत १८-२० - मध्यम दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य जाकी ९२१८ - १०५ ते ११० - बागायत १८-२० - पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य
 रब्बी ज्वारी 

जिरायती आणि बागायती क्षेत्रासाठी सुधारित व संकरित जाती जमिनीच्या प्रकारानुसार निवडाव्यात. ⭐️जातींची निवड - हलकी जमीन (जमिनीची खोली ३० सें.मी.पर्यंत) : फुले अनुराधा, फुले माउली मध्यम जमीन (खोली ६० सें.मी. पर्यंत) : फुले सुचित्रा, फुले माउली, फुले चित्रा, परभणी मोती, मालदांडी-३५-१ भारी जमीन (खोली ६० सें.मी. पेक्षा जास्त) : फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.व्ही. २२, पी.के.व्ही. क्रांती, सी.एस.एच. १५, सी.एस.एच. १९ बागायती जमीन : फुले रेवती, फुले वसुधा, सी.एस.व्ही. १८, सी.एस.एच. १५, सी.एस.एच. १९ हुरड्यासाठी : फुले उत्तरा, फुले मधुर लाह्यासाठी : फुले पंचमी पापडासाठी : फुले रोहिणी

भात  🌾🌾
भात खाचरामध्ये पोटरीच्या अवस्थेत ५ ते १० सेंमी, तर फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत १० सेंमी पाण्याची पातळी राखावी. सततच्या पावसामुळे भातावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस (२५ एएफ) १.८ मिलि किंवा ट्रायझोफॉस (४० इसी) १.३ मिलि प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. निळे भुंगेरे या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस (४० इसी) १.२५ मिलि किंवा लॅमडा सायहॅलोथ्रिन (५ इसी) ०.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. खाचरातून पाण्याचा योग्य निचरा होईल, याची काळजी घ्यावी.

 

                  कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा     


Post a Comment (0)
Previous Post Next Post