पिक सल्ला- पूर्वहंगामी ऊस, पूर्वहंगामी ऊस, सुरु ऊस (krushikapp)

पूर्वहंगामी ऊस
 पूर्वहंगामी ऊस पिकावरील शेंडे कीड, कांडी कीड नियंत्रणासाठी प्रादुर्भावित उसाचे शेंडे काढून अळीसह नष्ट करावेत. एकरी २ फुले ट्रायकोकार्ड प्रत्येक १५ दिवसाला उसात लावावीत. ही प्रसारणे तोडणीपूर्वी १ महिन्यापर्यंत चालू ठेवावीत.




खोडवा ऊस 

ऊस पिकात लोह (फेरस) व जस्त (झिंक) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे केवडा ही विकृती आढळते. चुनखडीयुक्त जमिनीत याचे प्रमाण जास्त दिसून येते. खोडवा पिकात सुरुवातीच्या फुटव्यात केवडा जास्त आढळतो. केवड्यामुळे उसाच्या पानांवर सुरुवातीस पिवळसर किंवा पांढऱ्या समांतर रेषा दिसून येतात. काहीवेळा पाने पूर्णपणे पांढरी पडून केवड्यासराखी दिसतात. केवडा वाढल्याने पानांचे प्रकाश संश्लेषणाचे कार्य मंदावते. परिणामी ऊसाच्या संख्येवर व पर्यायाने ऊसाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. केवडा नियंत्रणासाठी, चुनखडीयुक्त जमिनीत पहिली खतमात्रा देतेवेळी फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट प्रत्येकी एकरी १० किलो मात्रा शेणखतात मिसळून जमिनीत द्यावी. उभ्या पिकात केवडा आढळल्यास ५ ग्रॅम फेरस सल्फेट अधिक ५ ग्रॅम झिंक सल्फेट अधिक २० ग्रॅम युरिया प्रति लिटर पाणी या द्रावणाच्या २ ते ३ वेळा फवारण्या कराव्यात.


सुरु ऊस 

ऊस पिकातील खोडकीडग्रस्त ऊस उपटून अळीसह नष्ट करावा. खोडकिडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रतिएकरी २ कामगंध सापळे (ई.एस.बी. ल्यूर) शेतात लावावेत. कामगंध सापळ्याकडे नर पतंग आकर्षित होतात व सापळ्यात अडकतात. परिणामी पुढील प्रजोत्पादनास आळा बसतो. खोडकिडीच्या जैविक नियंत्रणासाठी, ऊस लागवडीनंतर ४० ते ५० दिवसांनंतर ट्रायकोकार्ड १ ते २ प्रतिएकरी या प्रमाणात साधारणत: १० ते १५ दिवसांच्या अंतराने लावावीत. खोडकिडीच्या रासायनिक नियंत्रणासाठी, क्लोरअँट्रानिलीप्रोल (०.४ जीआर) ७.५ किलो प्रतिएकरी किंवा फिप्रोनील (०.३ जीआर) १० ते १३ किलो प्रतिएकरी या प्रमाणात वापरावे. हे कीटकनाशक वापरताना त्यात बारीक माती ३ किलो प्रति १ किलो रसायन या प्रमाणात चांगली मिसळावी. नंतर हे मिश्रण कुदळीने अर्धा फूट अंतरावर चळी घेऊन मातीआड करावे व हलके पाणी द्यावे. सर्व प्रकारच्या ऊस पोखरणाऱ्या किडींसाठी ही उपाययोजना करावी; त्यामुळेच चांगले कीड नियंत्रण होते. पाण्याच्या पाळ्या जर वेळेवर देता येत नसतील, तर पाचटाचे मल्चिंग अवश्‍य करावे. त्यामुळेदेखील खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो. ऊस पिकामध्ये पुरेशा प्रमाणात पालाशयुक्त खते वापरल्यास या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

संपूर्ण  माहितीसाठी खालील विडिओ नक्की बघा

           कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा 

Post a Comment (0)
Previous Post Next Post