अँक्टोसॉल- शाश्वत शेतीचा आधार- Actosol (krushik app)




अँक्टोसॉल- शाश्वत शेतीचा आधार
Actosol

देशात रासायनिक खतांचा वापर वाढत चालला असला तरी उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी वापरात येणारी खतांची मात्रा कमी आहे. त्याची मुख्य करणे म्हणजे खतांच्या वाढत्या किमंती आणि कमी प्रमाणातील उपलब्धता.

कृषी उत्पादन वाढीच्या या सर्व प्रयत्नात जमिनीतील अतिरिक्त शोषण झाल्याचे दिसून येते. रासायनिक खतांच्या सतत वापरामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंचा ह्यास होतो व जमिनीची उत्पादकता कमी होते. शेतीची सुपीकता टिकवण्यासाठी जैविक शास्त्राची मदत हाच शाश्वत शेतीचा आधार, अशी संकल्पना दृढ होत आहे. ह्या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक व कमी खर्चाची शेती पद्धत म्हणजेच सेंद्रिय व जैविक खतांचा वापर.

आजपर्यंत विविध देशात निरनिराळ्या प्रकारच्या जमिनी व पिकांवर घेण्यात आलेल्या प्रयोगांनुसार व जगातील नामांकित सेंद्रिय प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थांनी प्रमाणित केलेले अँक्टोसॉल हे महत्वाचे अन्नद्रव्य म्हणून सिद्ध झाले आहे. उत्पादन वाढ, जैविक- अजैविक ताण, अन्नद्रव्यांचे वहन, जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी करणारे, तसेच मुळीच्या वाढीसाठी उपयुक्त असे अनेक फायदे देणारे अन्नद्रव्य म्हणून जगभरात त्याला महत्व आले आहे.


अँक्टोसॉल वापरण्याचे फायदे:

  •  जमिनीमध्ये असणाऱ्या उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ करते.

  •   जमिनीची उगवण क्षमता तसेच उत्पादन वाढते.

  •  कर्बग्रहण क्रिया वाढून पानांमध्ये काळोखी वाढण्यास मदत करते

  •  तसेच कर्बग्रहण प्रक्रियेमधे वाढ झाल्यामुळे जमिनीची पोत सुधारते.

  •  जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. दुष्काळी        परिस्थीतीत कमी पाण्यातही पिकांना तग धरून राहण्यास मदत करते.


  •   पिकांच्या वाढीसाठी मदत करते तसेच पेशींच्या विभाजनास मदत होते. पांढर्‍या मुळांची संख्या वाढवते त्यामुळे झाडांना पोषक अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत होते.


मात्रा:

बहुवार्षिक पिकांसाठी १० लिटर प्रती एकरी

हंगामी पिकांसाठी ५ लिटर प्रती एकरी

पॅकिंग:

१० लिटर मध्ये उपलब्ध



अधिक माहिती साठी कृषि विज्ञान केंद्र , बारामतीच्या कृषिक अँप मध्ये उत्पादने विभागामध्ये उपलब्ध आहे कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा 
संपर्क-९६२३२४३६८१

                

1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post