🔴 लाल कांद्याची आवक वाढली, दर दबावात
• अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटातून वाचलेला लाल कांदा आता बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे.
• उशिराने सुरू झालेली कांद्याची आवक सध्या एकाचवेळी वाढल्याने बाजारात पुरवठा वाढला आहे.
• देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कांद्याची मागणी घटलेली आहे.
• वाढलेला पुरवठा आणि घटलेली मागणी यामुळे कांद्याचे बाजारभाव झपाट्याने घसरले आहेत.
• उत्पादन खर्चात सुमारे ३५ टक्क्यांची वाढ झाली असताना शेतकऱ्यांच्या हाती येणारा दर तोकडा ठरत आहे.
• त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून दुहेरी संकट निर्माण झाले आहे.
• मागील महिन्यापर्यंत बाजारात उन्हाळी कांद्याची मर्यादित आवक होती.
• सध्या उन्हाळी कांद्याची आवक पूर्णपणे थांबलेली आहे.
• सुरुवातीच्या टप्प्यात नवीन लाल कांद्याची आवक कमी असल्याने दर समाधानकारक होते.
• मात्र काढणीला वेग आल्याने आवक वाढली असून बाजारावर दबाव निर्माण झाला आहे
अधिक माहिती साठी आताच डाउनलोड करा कृषिक ॲप

