अतिवृष्टीनंतर हळद पिकाचे व्यवस्थापन
👉🏽 पुराचे पाणी येऊन गेलेल्या पिकामध्ये पाण्याचा जास्तीत जास्त निचरा होईल, या पद्धतीने पाण्याचे नियोजन करावे.
👉🏽 पुराच्या पाण्यामध्ये हळद बुडली असल्यास पाणी ओसरताच पानावर पाण्याचा फवारणी करून चिखल धुऊन काढावा. त्यानंतर फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा (मुख्य अन्नद्रव्ये) वापर करावा. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य १.५ मि.लि. प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. त्यामध्ये सिलिकॉन घटक असलेला स्टीकर वापरावा.
👉🏽 सद्यपरिस्थितीत हळद पीक शाखीय वाढीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. या अवस्थेमध्ये शेतामध्ये पाणी साठून राहिल्यास कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी.
👉🏽 कंदकुजीचे जैविक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी म.फु.कृ.वि, राहुरीचे फुले सुपर बायोमिक्स किंवा व.ना.म.कृ.वि., परभणी यांनी विकसित केलेळे बायोमिक्स २ लिटर प्रति एकर याप्रमाणे आळवणीद्वारे वापरावे.
👉🏽 कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसत असल्यास क्विनॉलफॉस १.५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
👉🏽 ढगाळ वातावरण आणि आर्द्रता वाढल्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा मॅन्कोझेब २.५-३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
👉🏽 हळद पाण्यामध्ये बुडल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ पूर्णतः थांबते. पिकाची जोमदार वाढ पुन्हा सुरू होण्यासाठी शिफारशीत अन्नद्रव्यांचा वापर करावा.
👉🏽 पावसाची उघडीप मिळाल्यावर भरणी करताना निंबोळी पेंड एकरी २५० किलो या प्रमाणात इतर खतांबरोबर वापरावी.
👉🏽 पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रति एकरी ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश तसेच ५ किलो सिलिकॉनचा वापर करावा.
➖➖➖

