हळद पिकातील पानावरील ठिपके (लिफ स्पॉट) रोग नियंत्रण

हळद पानावरील ठिपके (लिफ स्पॉट)

⭕ पानावरील ठिपके (लिफ स्पॉट)

पानांवर अंडाकृती, लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. पान सूर्याकडे धरून पाहिल्यास ठिपक्यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात. जास्त तीव्रतेमध्ये ठिपके एकत्र येऊन संपूर्ण पान करपते. पान तांबूस राखी-तपकिरी रंगाचे दिसते, वाळून गळून पडते.

🛡उपाययोजना

👉🏾लागवडीसाठी रोगमुक्त बियाणे वापरावे.

👉🏾रोगट पाने कापून घेऊन जाळून टाकावीत.

👉🏾नियंत्रणासाठी, मॅन्कोझेब २ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.

👉🏾तीव्रता वाढल्यास, बोर्डो मिश्रण १ टक्का किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ ईसी) १ मि.लि. किंवा क्लोरथॅलोनील (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारावे.

➖➖➖

हळद पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी आणि राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती.  कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन  वरुन डाउनलोड करा.  📱📱📱


Post a Comment (0)
Previous Post Next Post