विविध पद्धतीने हळद पिकातील लागवड


कशी कराल हळद पिकातील लागवड पद्धत


लागवड पद्धती

सरी-वरंबा पद्धत:
सरी-वरंबा पद्धतीने लागवडीसाठी ७५ ते ९० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. जमिनीच्या उतारानुसार सहा ते सात सरी-वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुऱ्याची लांबी ५ ते ६ मीटर ठेवावी. वरंब्याच्या दोन्ही बाजूंना ३० सें.मी. अंतरावर कंदांची लागवड करावी. कंदावर ३ ते ४ इंच माती येईल अशा पद्धतीने कंद लावावेत. एकरी २८-२९,००० कंद लागतात.

रुंद वरंबा/ गादीवाफा पद्धत:
ही पद्धत यांत्रिकीकरण व ठिबक किंवा तुषार सिंचनासाठी उपयुक्त ठरते. या पद्धतीद्वारे विद्राव्य खतेही देता येतात, उत्पादनात वाढ मिळते. या पद्धतीत ४ ते ५ फूट अंतर ठेवून सऱ्या पाडाव्यात. वरंबे सपाट करून १ फूट उंचीचे आणि ६० सें.मी. सपाट माथा असलेले गादीवाफे बनवावेत. जास्त पावसाच्या प्रदेशात गादीवाफ्याची उंची १.५ फूट ठेवावी. गादीवाफ्याच्या बरोबर मध्यभागी लॅटरल अंथरून घ्यावी. लॅटरलच्या दोन्ही बाजूंना १५ सें.मी. अंतरावर कंद उभे किंवा आडवे लावावेत, म्हणजे दोन ओळींमधील अंतर ३० सें.मी. राहते. दोन कंदामधील अंतरही ३० सें.मी. ठेवावे. एकरी साधारणतः २२-२३,००० कंद लावले जातात. तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी दोन सऱ्यांमधील अंतर ६ फूट ठेवावे. गादीवाफ्याची उंची १ फूट व रुंदी ४ फूट ठेवावी. दोन्ही बाजूंना १५ सें.मी. अंतर ठेवून दोन ओळींमधील अंतर ३० सें.मी. ठेवावे. एका गादीवाफ्यावर कंदांच्या चार ओळी लावाव्यात. दोन कंदांमध्ये ३० सें.मी. अंतर ठेवावे. गादीवाफे पूर्ण भिजवूनच लागवड करावी.

➖➖➖

राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. हळद पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन  वरुन डाउनलोड करा.  📱📱📱


Post a Comment (0)
Previous Post Next Post