हळदीचा पाला कापून ठेवल्यानंतर पाऊस आल्यास वाफसा आल्यानंतर लगेच काढणी करावी. अन्यथा हळकुंडाच्या टोकांना कोंब फुटण्यास सुरवात होते. परिणामी हळदीतील कर्बोदकांचे प्रमाण कमी होते. प्रक्रिया केल्यानंतर हळकुंडावर सुरकुत्या पडतात. हळदीची काढणी केली असल्यास ओली हळकुंडे पावसात भिजल्यास त्यावर फारसा परिणाम होत नाही.
पुढील वर्षासाठी वापरण्यात येणारे बियाणे पावसामध्ये भिजणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा साठवणुकीमध्ये बियाणे सडण्याचा धोका राहील. तसेच पूर्ण सुकलेली हळदही कोणत्याही परिस्थितीत पावसात भिजू देऊ नये. त्यामुळे पाऊस येण्याच्या काळात बियाणे व सुकलेली हळद पॉलिथिनच्या कापडात तात्पुरती गुंडाळून ठेवावी. जेव्हा पाऊस संपून वातावरण पूर्ण कोरडे होईल, तेव्हा पॉलिथिन कापडातून बियाणे वा सुकलेले हळकुंड बाहेर काढून ठेवावे.
➖➖➖
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. हळद पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन वरुन डाउनलोड करा. 📱📱📱