प्रक्रियायुक्त पदार्थ
✨ हळद पावडर
हळद पावडर तयार करण्यासाठी प्रथम जाड मोठ्या हळकुंडाचा इलेक्ट्रीक मोटारीवर चालणार्या चक्कीवजा मशिनमध्ये भरडा केला जातो. मशिनमध्ये भरडा पुढे जाऊन हळद पावडर तयार केली जाते. ही पावडर वेगवेगळ्या मेशच्या जाळीतून बाहेर पडून शेवटी ३०० मेश जाळीमधून बाहेर पडते. तयार पावडर ५, १०, २५ किलो आकाराच्या प्लॅस्टिक किंवा कापडी पिशवीमध्ये पॅकिंग करून विक्रीसाठी पाठवले जाते.
͢͢ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
✨ कुरकुमीन
वाळलेल्या हळदीचा पिवळेपणा कुरकुमीनमुळे दिसून येतो. अधिक कुरकुमीन असलेल्या हळदीस चांगला बाजारभाव मिळतो. वाळलेल्या हळद पावडरपासून इथाईल अल्कोहोल हे द्रावक वापरून कुरकुमीन नावाचा घटक वेगळा काढता येतो. हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जातीपरत्वे २ ते ६ टक्के इतके असते. कुरकुमीनपासून अनेक आयुर्वेदिक औषधे, तसेच सौंदर्य प्रसाधने बनविता येतात. वाणपरत्वे हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण बदलते. फुले स्वरूपा या जातीमध्ये सर्वाधिक कुरकुमीनचे प्रमाण ५.१९ टक्के इतके आढळले आहे. सेलम ही जातदेखील कुरकुमीनसाठी (४.५ टक्के) उत्तम आहे.
➖➖➖ ➖➖➖