आदर्श घड कापणीचे निकष
👉🏽 घड कापणीसाठी वेगवेगळ्या निकषांचा वापर केला जातो. उदा. गर-साल यांच्यातील प्रमाण, फळांच्या सालीतला टिकाऊपणा, व्यावहारिक दृष्टिकोन.
👉🏽 घड निसवण्यापासून कापणीपर्यंतचा कालावधी जातीपरत्वे आणि हवामानानुसार ठरलेला असतो. आपल्या भागात डाॅर्फ कॅवेंनडिश जातीचे घड निसवल्यानंतर ९८-११५ दिवसांत पक्व होतात. घेर जेव्हा ३१-४१ मि.मी.पर्यंत पोचतो तेव्हा घड कापणीस तयार होतो.
👉🏽 केळ फळाचा जसा विकास होतो तसा त्याचा आकार गोलाकार होतो. पूर्णपणे फळ पक्व झाल्यावर फळावरील शिरा नाहीशा होतात आणि फळ गोलाकार होते. निर्यातीसाठी घडातील दुसऱ्या फणीतील केळी तीन चतुर्थांश गोल झाली आणि घडांचे वय ११ ते १२ आठवडे झाले म्हणजे घड कापणीस तयार आहे असे समजावे.
➖➖➖
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन वरुन डाउनलोड करा. 📱📱📱