🥒 खत व्यवस्थापन
👉🏽 वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये माती परीक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापरावीत.
👉🏽दोडका, कलिंगड, खरबूज पिकाला प्रति एकरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खतांची मात्रा आवश्यक आहे. यापैकी अर्धे नत्र (२० किलो), संपूर्ण स्फुरद (२० किलो) व संपूर्ण पालाश (२० किलो) लागवडीवेळी द्यावे. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा (२० किलो) लागवडीनंतर ३०, ४५ व ६० दिवसांनी तीन समान हप्त्यांत विभागून बांगडी पद्धतीने रोपांच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळांच्या क्षेत्रात द्यावी. खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.
👉🏽काकडी, दुधी भोपळा, कारले पिकाला प्रति एकरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खतांची मात्रा आवश्यक आहे. यापैकी अर्धे नत्र (२० किलो), संपूर्ण स्फुरद (२० किलो) व संपूर्ण पालाश (२० किलो) लागवडीवेळी द्यावे. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा (२० किलो) लागवडीनंतर ३० व ४५ दिवसांनी दोन समान हप्त्यांत विभागून बांगडी पद्धतीने रोपांच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळांच्या क्षेत्रात द्यावी. खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.
👉🏽सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी, आवश्यकतेनुसार लागवडीवेळी एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मॅंगेनीज सल्फेट व २ किलो बोरॅक्स शेणखताबरोबर अथवा निंबोळी पेंडीसोबत मिसळून द्यावे.
➖➖➖
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. केळी सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन वरुन डाउनलोड करा. 📱📱📱