आंतरपीक घेणे
केळी पिकात लागवडीनंतर सुरूवातीच्या साडेतीन ते चार महिन्यांच्या काळात आंतरपीक घेणे शक्य होते. मात्र ही आंतरपिके मुख्य केळी पिकाशी स्पर्धा करणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच ही विषाणूजन्य रोगांची पर्यायी यजमान पिके (उदा. वेलवर्गीय, टोमॅटो, मिरची, वांगी इ.) नसावीत. केळी पिकात दोन ओळींच्या दरम्यान भुईमूग, मूग किंवा चवळी या आंतरपिकांची शिफारस करण्यात आली आहे. अशी पिके आंतरपीक म्हणून घेतल्यास जमिनीचा पोत सुधारून सुपीकता टिकविली जाते. तसेच तणांचेही नियंत्रण होण्यास मदत होते.
➖➖➖
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. केळी सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन वरुन डाउनलोड करा. 📱📱📱