रब्बी मका पिकातील पाणी व्यवस्थापन

💧 पाणी व्यवस्थापन 
मका पिकातील पाणी नियोजन

मक्‍याची पाने रुंद व लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानांतून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची गरज अधिक असते. मका पीक पाण्याच्या ताणास संपूर्ण कालावधीमध्ये संवेदनशील आहे. पेरणी केल्यानंतर लगेच पाणी द्यावे. पिकाची रोप अवस्था (पेरणीनंतर २५ ते ३० दिवस), तूरा बाहेर पडताना (पेरणीनंतर ४५ ते ५० दिवस), फुलोर्‍यात असताना (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवस), दाणे भरण्याच्या वेळी (पेरणीनंतर ७५ ते ८० दिवस) या संवेदनशील अवस्थांच्या वेळी पाण्याचा ताण पडू देऊ नये, अन्यथा उत्पादनात लक्षणीय घट येते.
पीक फुलोऱ्यात आणि दाणे भरत असताना कमी अंतराने भरपूर पाणी द्यावे. म्हणजे कणसे भरण्यास मदत होते. मका फुलोऱ्यात असताना जमिनीत पाण्याचे प्रमाण कमी असल्यास स्त्रीकेसर बाहेर पडण्यास उशीर झाल्यामुळे बीजधारणा कमी होऊन उत्पादन घटते. म्हणून पीक तुऱ्यावर आणि स्त्रीकेसर अवस्थेत असताना पाण्याची आवश्यकता अधिक असते.

➖➖➖

राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. कापूस व सोयाबीन पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की  (प्ले स्टोअरच्या) लिंक वरुन डाउनलोड करा. 📱📱📱
    




Post a Comment (0)
Previous Post Next Post