गव्हाची पेरणी केल्यानंतर लगेच शेत ओलवून घ्यावे. पेरणीनंतर साधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाळ्यांचे नियोजन करावे. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी ४ ते ५ वेळा पाणी द्यावे लागते.
संवेदनशील अवस्था पेरणीनंतरचे दिवस
मुकुटमुळे फुटण्याची अवस्था १८ ते २०
कांडी धरण्याची अवस्था ४५ ते ५०
फुलोरा अवस्था ६० ते ६५
दाण्यात दुधाळ/ चीक अवस्था ८० ते ८५
दाणे भरण्याची अवस्था ९० ते १००
👉🏽 पाण्याच्या उपलब्धतेनुसार सिंचन नियोजन
एकच पाणी देणे शक्य असल्यास ते ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी, तर तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
➖➖➖
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. तूर पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन वरुन डाउनलोड करा. 📱📱📱